Header AD

एनआरसीच्या थकबाकी पोटी अदानी समूहाचा महावितरणला १.६९ कोटींचा भरणा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  अदानी समूहाने एनएअरसी लिमिटेडची पूर्वीची महावितरणची थकबाकी पूर्णपणे चुकती केली व त्यापोटी महावितरणच्या कल्याण कार्यलयात १.६९ कोटी रकमेचे दोन धनादेश सादर केले. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अदानी समूहाचे आभार मानले.


एनएअरसी लिमिटेड हि कल्याण मोहने स्तिथ कंपनी सप्टेंबर २००९ मध्ये बंद पडली,  त्यानंतर गंभीर आर्थिक परिस्थितीमुळे कंपनीकडून वीजबिलाचा नियमित भरणा करण्यात येत नव्हता. शेवटी महावितरणने २०१६ मध्ये कंपनीचा वीज पुरवठा तोडला. परंतु अनेक निवेदने मिळाल्याने कॉलनीला ज्या पंप हाऊस मधुन पाणी पुरवठा होत होता त्या लाईनचा पुरवठा महावितरणने सुरु केला. परंतु एनआरसी लिमिटेड कडून पम्प हाऊसचे बिल पण भरले जात नव्हते. यावरून कंपनी व महावितरण यांच्यात वाद-विवाद सुरु होते. 


दरम्यानच्या काळात आर्थिक संस्थांनी एनआरसी विरोधात २०१८ मध्ये दिवाळखोरी आणि नादारी कायद्याच्या (आयबीसी) अंतर्गत राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद (एनसीएलटी) मध्ये कर्ज वसुलीसाठी दावा दाखल केला. एनसीएलटी कोर्टाच्या आदेशानुसारकोर्टाने जो नादारी आदेश काढला त्या आधीची सर्व देणी हि रद्दबातल होतात. त्यामुळे आयबीसी कायद्याच्या तरतुदी नुसार कोर्टाच्या नादारी आदेशाच्या दिवसापासून जे विजेचे बिल असेल तेवढेच अदानी समूह देणे लागतो. त्यानुसार अदाणी समूहाने आपले म्हणणे महावितरण समोर मांडले व त्यांनतर महावितरणने १.६९ कोटी रुपयांचे नवीन देयक अदानी समूहाला पाठवले. त्यानुसार अदानी समूहाने या बिलाची रक्कम भरणा केली आहे. 


एनआरसीच्या थकबाकी पोटी अदानी समूहाचा महावितरणला १.६९ कोटींचा भरणा एनआरसीच्या थकबाकी पोटी अदानी समूहाचा महावितरणला १.६९ कोटींचा भरणा Reviewed by News1 Marathi on April 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads