एकीकडे पाणी कपात तर दुसरीकडे पाण्याची नासाडी

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  उल्हास नदी पाण्याचे नियोजन करण्यासाठीकल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकीकडे पाणी कपात केली जात आहे तर पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुसरीकडे पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ६ आणि२० एप्रिल या दोन दिवसांकरीता २४ तासांकरीता पाणी पुरवठा बंद राहणार आहे. गेल्या दोन महिन्यापासून पाणी कपात केली जात आहे. असे असतानाकेडीएमसीच्या मोहिली जलशुद्धीकरणातून पाणी पुरवठा करणा:या जलवाहिनीचा व्हॉल्व तुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. नादुरुस्त व्हॉल्वमुळे पाण्याचा फवारा उंचावर उडत होता. त्या पाण्यात स्थानिक तरुण अंघोळीचा आनंद लूटत होते तर काही रिक्षा चालक त्यांची रिक्षा धूवत आहे.याबाबत महापालिकेचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी सांगिले कीसध्या पाणी पुरवठा बंद करुन दुरुस्तीचे काम सुरु असून लवकरच दुरुस्तीचे काम केले जाईल. 

Post a Comment

0 Comments