ब्रह्मांड कट्टा सामाजिक - सांस्कृतिक मंडळ अंतर्गत ब्रह्मांड मॉर्निंग - इव्हिनिंग वॉकर्स क्लब (BMC)
ठाणे , प्रतिनिधी  :   ब्रह्मांड करांच्या आरोग्या साठी एक पाऊल पुढे... ह्या सेवाभावी संस्थेच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून शनिवार दिनांक १३ मार्च,  २०२१ रोजी सकाळी ठिक ६.४५ ते ८.00 पर्यंत रिलायंस स्मार्ट समोर, ब्रह्मांड येथे BMC च्या माध्यमातून  डाॅ.केतकी चव्हाण  ( Dietician & Physiotherapist व संचालिका पँनसिया फिटनेस स्टुडिओ) यांच्या मार्फत रोजच्या जिवनातील आहार आणि व्यायाम यांचा सुयोग्य वापर करून उत्तम आरोग्य राखण्यासाठीचे मार्गदर्शन पर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या वेळी बॉडी फैट एनालिसिस टेस्टिंग मोफत करण्यात आले.


शेवटी नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे डॉ.केतकी चव्हाण यांनी दिली व काही आरोग्य विषयक साध्या सोप्या टीप्स आणि व्यायामाच्या काही प्रकारांचे प्रात्यक्षिक करून घेतले.  BMC ग्रुप मध्ये सामिल होण्यासाठी अध्यक्षा सौ. यशश्री आपटे 98335 10861 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक राजेश जाधव यांनी केले.

Post a Comment

0 Comments