भिवंडीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत नागरिकांनी सतर्क राहावे, आपले आरोग्य आपण जपावे - आयुक्त डॉ.पंकज आशिया

 



भिवंडी दि 20 ( प्रतिनिधी ) कोरोनाची दुसरी साथ येण्याची शक्यता आहे, तरी सर्व नागरिक यांनी सतर्क राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी केले. पालिका क्षेत्रातील प्रभाग समिती 3  व प्रभाग समिती 5 या क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत असल्याने याबाबत या भागातील नगरसेवक यांची बैठक नुकतीच आयुक्त डॉ.पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. 



             त्यावेळी आयुक्त बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, प्रभाग समिती क्रमांक 5 चे सभापती फाराज बाबा बावुद्दिन, माजी उपमहाौर मनोज काटेकर, नगरसेवक संतोष शेट्टी, श्याम अग्रवाल, अशोक भोसले, तल्हा मोमीन, शाब मोमीन,दिनेश पाटील, गजानन शेटे, डॉ.मेहुल जोशी  इत्यादीसह मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.कारभारी खरात, अन्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.  



             आयुक्त पुढे म्हणाले की,कोरोना बाबत   स्थानिक नगरसेवकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या माध्माद्वारे नागरिकांना कोरनाबाबत जागृत करावे, जास्तीत जास्त लोकांनी लस घेण्याकरता पुढे यावे. ही लस चांगल्या प्रकारे सुरक्षित असून त्याचे कोणत्याही प्रकारे दुष्परिणाम होत नाहीत.  तसेच आता कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू होत असताना महानगरपालिकेचे रुग्णवाहिका  सेवा सतर्क राहील याबाबत सूचना दिल्या. कोवीड रुग्णांना हॉस्पिटलमध्ये तातडीने रुग्ण यांना बेड, जागा मिळणे याकडे देखील लक्ष देण्यात येणार आहे. 



              मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील आपल्या भागात मोहल्ला क्लीनिक सुरू करावीत, या कामी  स्थानिक सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, याकामी पालिका योग्य ते सहकार्य करेल. जेणे करून,  कोरोनाचे येणार संकट दूर राहील,  प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावयाची आहे.  या बाबतीत राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना  दिलेल्या आहेत, त्याचे  तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. लस घेण्याबरोबरच मास्क  वापरणे, सामायिक अंतर ठेवणे , वारंवार हात धुणे, sanitizer वापर करणे आणि गर्दीची ठिकाणी टाळणे, जसे की बाजार पेठ, भाजी मार्केट, लग्न कार्य, धार्मिक प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम, अंत्ययात्रा या वेळी  गर्दी होत असल्याने त्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याची लक्षणे जास्त आहेत. तरी याबाबत देखील काळजी घेण्यात यावी.



          तसेच यावेळी इंदिरा गांधी रुग्णालय हे कोवीड हॉस्पिटल राहणार नाही तर   खुदाबक्ष  कोवीड सेंटर, वराला कोवीड  केंद्र, तसेच ठाणे सिव्हिल हॉस्पिटल, राज्य शासनाचे सावदे येथील कोवीड हॉस्पिटल येथे उपचार करण्यात येतील. यावेळेला  *महापालिकेकडे स्वतःची कोवीड तपासणी लॅब आहे* त्यामुळे दररोज तीनशे ते चारशे तपासण्या होऊ शकतात. त्यामुळे काळजी करण्यासारखे कारण नाही, असा विश्वास आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांनी व्यक्त केला. तसेच या वेळेला रुग्णाला घरातल्या घरात विलगीकरण  करण्यात येणार आहे. कोणालाही जबरदस्तीने अलागिकरण कक्षात ठेवले जाणार नाही, काही  खाजगी हॉस्पिटलमध्ये  लसीकरण सुरू करणे बाबत आयुक्त यांनी सांगितले की याबाबतचे सर्व निर्णय हे  केंद्रीय आरोग्य विभाग घेत असल्याने लसीकरण केंद्र वाढविण्याबाबत हा निर्णय देखील केंद्रीय आरोग्य विभाग घेणार आहे. 



             राज्य शासन, किँवा पालिकेला लसीकरण केंद्र वाढविण्याचा अधिकार नाही.जर रोजच्या रोज लसीकरण ईश्टांक पूर्ण झाले तर नक्कीच लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येईल. याकरता लसीकरण याकडे जास्त लक्ष द्यावे असे आवाहन पालिका आयुक्त यांनी सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना केले आहे. *परत मागील वर्षा प्रमाणे टाळेबंदी नको असेल तर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना याचे पालन करून पालिकेस सहकार्य करावे. नागरिकांमध्ये लसीकरणबाबत उदासीनता आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेऊन, कोरोना पासून  बचाव करावा असे आवाहन देखील पालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांनी केले.

Post a Comment

0 Comments