पालिका व ठेकेदार यांच्या कडून दिवा आगासन रस्त्यावर मोठा अपघात घडण्याची वाट पाहिली जातेय का? - रोहिदास मुंडे


रस्त्याचे काम सुरू असताना संरक्षक दुभाजक नसल्याने अपघात....


दिवा, प्रतिनिधी  :-  दिवा आगासन या रस्त्याचे काम मागील चार वर्षांपासून सुरू आहे,अतिशय संथपणे सुरू असणाऱ्या या कामाने खरं तर वर्ड रेकॉर्ड केला असताना आता या रस्त्याचे काम सुरू असताना संरक्षक दुभाजक न लावला गेल्याने वाहनांचे अपघात होऊ लागले आहेत. पालिका व ठेकेदार याठिकाणी मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का?असा सवाल यानिमित्ताने भाजपचे रोहिदास मुंडे यांनी केला आहे.


दिवा आगासन रस्त्याचे काम मागील तीन चार वर्षांपासून सुरू आहे.अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे.रस्त्याचे काम सुरू असताना केलेल्या खोदकाम मध्ये संरक्षक दुभाजक नसल्याने अपघात होत असून वाहने खड्यात कोसळत आहेत.


 सदर रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार कडून कोणत्याही सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबविल्या जात नसून याचा फटका नागरिकांना बसत असल्याकडे भाजपचे रोहिदास मुंडे यांनी लक्ष वेधले आहे. पालिका प्रशासन, सत्ताधारी व ठेकेदार दिव्यात मोठा रस्ता अपघात होण्याची वाट बघत आहेत का असा संतप्त सवाल रोहिदास मुंडे यांनी विचारला आहे.

Post a Comment

0 Comments