बंदी असताना बस्तान मांडलेल्या फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई डोंबिवली पूर्वे कडील काही भाग कारवाई पासून वंचित
डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोनाबाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बध लागू करण्यात आले.`मिशन बिगीन`अंतर्गत शनिवारी आणि रविवारी  फेरीवाले,खादये व पेयांच्या हातगाड्या यांना बसण्यास बंदी केली आहे.पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त पल्लवी भागवत,डोंबिवलीतील`फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पाटील यांसह कर्मचारी वर्गानी यांनी चिमणी गल्ली, फडके रोड,स्टेशनबाहेरील परिसरात फेरीवाल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.तर विविध चौकात पालिकेने कानाडोळा केल्याने फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याचे दिसले.


       कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे महापालिकेने कोरोना विषाणूचा प्रभाग रोखण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत.शनिवारी व रविवारी फेरीवाले,खादये व पेयांच्या हातगाड्या बंदी केली आहे. असे असताना सुधा डोंबिवली पौर्वेकडील काही भागात फेरीवाल्यांना वावर सुरु होता.परंतु पालिकेच्या उपायुक्त भागवर,डोंबिवलीतील`फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी पाटील यांसह कर्मचारी वर्गानी फेरीवाल्यांना पिटाळून लावले.कडक निर्बंधांची माहिती असताना फेरीवाले बिनदिक्तपणे बसले होते.


              फेरीवाल्यांना पिटाळून लावून काहींचे समान जप्त करण्यात आले.तर डोंबिवलीतील चेडा रोड, सारस्वत कॉलिनी, गिरनार चौक, दत्तनगर चौक याठीकाणी मात्र फेरीवाले विनामास्क बसले होते.त्यामुळे सदर ठिकाणी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसते.पालिकेने फक्त स्टेशनपरिसर, फडके रोड आणि नेहरू रोड या ठिकाणी कारवाई करून धन्यता न मानता विविध चौकात हि पालिका प्रशासने कारवाई करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Post a Comment

0 Comments