एस एस क्लिनिकच्या माध्यमातून डॉ.राहुल दुबे यांनी केला रुग्ण सेवेचा संकल्प

 

■कोरोना कालावधीत केलेल्या साहसाचे कौतुक....

कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  कोरोना काळात जिथे व्यवसाय ठप्प पडत आहेत, तिथे महामारीच्या या अवघड अवस्थेत डॉ राहुल दुबे यांनी स्वत: चे क्लिनिक सुरु करत रुग्ण सेवेचा संकल्प केला आहे.

गुरुवारी शिवरात्रीच्या दिवशी कल्याणच्या नीरज सिटी येथील बारावे रोडवर 'एस एस क्लिनिकचे  उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुंबईतील अनेक नामांकित व्यक्ती उपस्थित होते. क्लिनिकचे उद्घाटन शिवसेनेचे नगरसेवक व केडीएमसीचे माजी महापौर रमेश जाधवमुथा महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा, टाटा मेमोरियल सेंटरचे सीनियर साइंटिस्ट डॉ.संजय गुप्ता आणि स्थानिक नगरसेविका रजनी मिरकुटे यांनी केले. यावेळी माजी नगरसेविका रेखा जाधवसिटी क्रिटीकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ नितीन झबक उपस्थित होते.


 कोरोना काळात घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे कौतुक करत केडीएमसीचे माजी महापौर रमेश जाधवसामाजिक कार्यकर्ते प्रकाश मुथा आणि डॉ.संजय गुप्ता यांनी डॉ.राहुल दुबे यांचे अभिनंदन केले. ज्येष्ठ पत्रकार एस एन दुबे  यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments