ते आले, बघितले, पाहणी केली आणि निघून गेले! वडवली पुलाचा पालकमंत्र्यांनी केले असे उद्घाटन.
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका व रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त खर्चाने बांधलेल्या बहुचर्चित वडवली पुलाचा आज संध्याकाळी पाच वाजता उद्घाटन होते. मात्र राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तब्बल दीड तास उशिरा आले. हौशी कार्यकर्त्यांनी उद्घाटनाची रिबिन लावली होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या गाड्यांच्या ताफा उद्घाटनाच्या ठिकाणी न उतरता त्यांनी पूलाची अखेरपर्यंत पाहणी केली आणि निघून गेले.


गेल्या आठवड्यात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या पुलाचे उद्घाटन करून लोकार्पण सोहळा पार पाडला होता.कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने आज अधिकृतपणे पुलाच्या उद्घाटनाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे योजले होते.त्याचप्रमाणे शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण पुलावर आपापल्या पक्षाचे झेंडे लावले होते. सामाजिक अंतराचे भान मात्र दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी पाळल्याचे दिसून येत नव्हते. पोलिसांनी मात्र वर्ताकनासाठी आलेल्या पत्रकारांना  २५ पत्रकारांची संख्या असावी अशी जाणीव करून देत होते. 


भाजपाचे  कार्यकर्ते मात्र आपल्या पक्षाच्या नेत्या बरोबर फोटो काढण्यात रमले होते.  उद्घाटनाची फित कापणाच्या उद्देशाने कार्यकर्ते सक्रीय झाले होते. मात्र पालक मंत्री आपल्या गाडीतून न उतरता पुलाची पाहणी दौरा केला.गाडी आल्यानेच उद्घाटन झाल्याचे तत्वतः सर्वांनी मान्य केले. उद्घाटनाच्या येथे पालकमंत्री न थांबता ते आले, वडवली पूल कसा आहे याची पाहणी केली आणि आपल्या ताफ्यासह ते निघून गेले. यावेळी भाजपाचे भिवंडीचे खासदार कपिल पाटील, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार रविंद्र पाठक त्याच बरोबर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, रेल्वे चे मंडळ प्रबंधक शालव गोवल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.अशाच स्वरूपाचे उद्घाटन वालधुनी पुलाचे देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.


कार्यक्रम हायजॅक!
हा कार्यक्रम शासकीय असताना शिवसेना व भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रोटोकॉल न पाळता प्रमुख पाहुणे बसण्याच्या ठिकाणी आपल्या पक्षाचे झेंडे लावल्याचे दिसून येत होते. तर प्रशासकीय अधिकारी आडबाजूला उभे राहिल्याचे दिसून आले. थोडक्यात हा कार्यक्रम भाजपा व शिवसेनेने हायजॅक केल्याचे दिसून आले.

Post a Comment

0 Comments