कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच कोरोना रुग्णांनी ओलांडला ६६ हजारांचा टप्पा ४१६ नवीन रुग्ण
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरूच असून कोरोना रुग्णांनी ६६ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज तब्बल ४१६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही.      आजच्या या ४१६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६६,११३ झाली आहे. यामध्ये २७१९ रुग्ण उपचार घेत असून ६२,२१६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ४१६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-७७,  कल्याण प – ९९डोंबिवली पूर्व १५५डोंबिवली प – ७४मांडा टिटवाळा – ०८, तर मोहना येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.


Post a Comment

0 Comments