कल्याण डोंबिवलीत आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण ६८६ नवीन रुग्ण तर २ मृत्यू


   

■रुग्णांनी ओलांडला ७१ हजारांचा टप्पा..कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आतपर्यंतचे सर्वाधिक रुग्ण सापडले असून कोरोना रुग्णांनी ७१ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.  आज सर्वाधीक तब्बल ६८६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ४२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज दोन मृत्यू झाले आहे.


 

          आजच्या या ६८६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ७१,२२९ झाली आहे. यामध्ये ५१५५ रुग्ण उपचार घेत असून ६४,८७७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ६८६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-८७कल्याण प – २६डोंबिवली पूर्व २३५डोंबिवली प – ९७मांडा टिटवाळा – ३०तर मोहना येथील ११ रुग्णांचा समावेश आहे.

 


Post a Comment

0 Comments