शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा


 


डोंबिवली ( शंकर जाधव ) वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकारी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व शेतकरी विरोधी कायदे घ्यावे अशी मागणी करण्यासाठी वंचित आघाडीच्या कल्याण डोंबिवलीतील पक्षाच्या वतीने कल्याण तहसीलदार दीपक आकडे निवेदन दिले. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आंदोलनाच्या विविध टप्प्यात वंचित आघाडीने पाठिंबा व्यक्त केला आहे. 

संसदेचे अधिवेशन सुरु असल्याने भारत बंदची हाक देण्याचा व संसदेवर मोर्चा शेतकरी संघटनेच्या वतीने काढण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन आता आणखी तिव्र करण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी केला आहे. निवेदन देतेसमयीवं.आ.च्या  जिल्हा अध्यक्ष मायाताई कांबळेउपाध्यक्ष जे. जे. मानकरउपस्थित होते. आंदोलनाचे आयोजन संतोष गायकवाड कल्याण पश्चिम अध्यक्षसुरेंद्र ठोके डोंबिवली पु. अध्यक्षमनोज धुमाळ कल्याण पु अध्यक्षगौतम गवई,  डोंबिवली पश्चिम अध्यक्ष महासचिव मिलिंद साळवे यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments