राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची जंबो कार्यकारणी जाहीर


■महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना वाढीकडे भर ५६ जणांचा कार्यकारणीत समावेश...


कल्याण , कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आगामी काही महिन्यात होणार असून या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने कल्याण डोंबिवली जिल्ह्याची जंबो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीमध्ये ५६ जणांचा समावेश आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसपार्टीचे  जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी हि कार्यकारणी जाहीर केली असून यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

     

             गेल्या काही वर्षात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला कल्याण डोंबिवली जिल्ह्यात उतरती कळा लागली आहे. अनेक दिग्गज लोकप्रतिनिधींनी पक्षाला रामराम ठोकल्याने केडीएमसीच्या मागील निवडणुकीत केवळ २ नगरसेवकच निवडून आले होते. यानंतर देखील पक्षाने स्थानिक नेत्तृत्व बदला बद्दल निर्णय न घेतल्याने विधानसभा निवडणुकीत देखील पक्षाला अपयशाला सामोरे जावे लागले. अखेर केडीएमसीच्या निवडणुका लक्षात घेऊन नोव्हेंबर २०२० मध्ये माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांची कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षपदी पक्षाने नियुक्ती केली. या नियुक्ती नंतर तीन महिन्यांनी कल्याण डोंबिवली जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जुने पदाधिकारी, नाराज असलेले तसेच पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे.        

        

            आज जाहीर केलेल्या या कार्यकारणीमध्ये २५ उपाध्यक्ष, १३ सरचिटणीस, ४ सचिव २ कोषाध्यक्ष, ४  विधानसभा अध्यक्ष, ६ विधानसभा कार्याध्यक्ष तर २ विधानसभा सरचिटणीस यांचा समावेश आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन सर्व पदाधिकार्यांनी बूथ स्थरा \पर्यंत काम करायचं असून यासाठी प्रत्येक विधानसभेमध्ये जवाबदारी सोपवली आहे. सगळ्यांना एकत्र काम करायचं असून तेव्हाच आपल्याला चांगला निकाल मिळेल अशाप्रकारे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तर केडीएमसी निवडणुकीसाठी सर्वच्या सर्व म्हणजेच १२२ प्रभागांसाठी तयारी सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments