कल्याण डोंबिवलीत २६४ नवीन रुग्ण तर एक मृत्यू

  कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज २६४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १६८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.      आजच्या या २६४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६,६९७ झाली आहे. यामध्ये २४५५ रुग्ण उपचार घेत असून ६२,०६४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २६४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-४६,  कल्याण प – ६५डोंबिवली पूर्व १००डोंबिवली प – ४२, तर  मांडा टिटवाळा येथील ११ रुग्णांचा समावेश आहे.


Post a Comment

0 Comments