इज ऑफ लिविंग निर्दे शांकात केडी,एम,सीचा बारावा क्रमांक
■केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालया तर्फे करण्यात आले सर्वेक्षण...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयातर्फे सन २०२० मध्ये दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या एकूण ११० शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने जाहीर केलेल्या इज ऑफ लिविंग निर्देशांकात कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने १२ वा क्रमांक पटकावला आहे. तर  पिंपरी-चिंचवड मनपा १६ व्या क्रमांकावरनागपूर मनपा २५ क्रमांकावर आणि नाशिक मनपा ३८ व्या क्रमांकावर आहे.


जीवनसुलभ शहरांचे मूल्यांकन करताना त्या- त्या शहरातील घनकचरा व्यवस्थापनस्वच्छताशिक्षणप्रशासननागरिकांचा प्रतिसाद, कामातील सातत्य इत्यादी निकषांवर सर्वेक्षण होऊन हे  मूल्यांकन करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्देशांक जाहीर करण्याच्या स्पर्धेच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अधिकारी- कर्मचारी व एसकेडीसीएल टीम यांनी अथक प्रयत्न करून विविध कार्यक्षेत्रात आमूलाग्र सुधारणा करीत इज ऑफ लिविंग निर्देशांकात बारावा क्रमांक प्राप्त करण्यात हातभार लावला आहे. सन २०१८ मध्ये केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालय तर्फे घेण्यात आलेल्या इज ऑफ लिविंग निर्देशांकामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका ५०  व्या क्रमांकावर होती.


Post a Comment

0 Comments