मोठा गाव ठाकुर्ली येथील रिंग रोड मधील बांधकामे जमीनदोस्त


कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका व एमएमआरडीए यांच्या संयुक्त विदयमाने महापालिका क्षेत्रात बाहयवळण रस्त्याचे काम (रिंगरोड) काम सूरु आहे. पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव ठाकूर्ली येथील ४५ मीटर रिंगरोड मधील रस्त्याच्या सीमारेषेत बाधित होणारी ५८ बांधकामे जमीनदोस्त  करण्यात आली.


 या कारवाईत ई प्रभागक्षेत्र आधिकारी भरत पवार, ह प्रभागक्षेत्र आधिकारी सुहास गुप्ते तसेच ``प्रभाग क्षेत्र अतिक्रमण विरोधी पथकाच्या मदतीने विष्णुनगर पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ पोलिस निरिक्षक व त्यांचे सहकारी आणि ४ जेसीबीचा वापर करुन करण्यात आली.

Post a Comment

0 Comments