खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने ठाणे जिल्हा सत्र न्याया लयातील वकिलांना विना मुल्य लस मिळणार…
ठाणे,  प्रतिनिधी  :  सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी जे वकील आपले कर्तव्य बजावत असतात अशा वकिलांना विनामुल्य लस उपलब्ध व्हावी यासाठी खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने ठाणे महापालिकेमार्फत शुक्रवार दिनांक 19 मार्च 2021 रोजी टेंभी नाका येथील वाडिया दवाखाना मध्ये दुपारी १२:00 ते सायं.4:00 या वेळेत लस उपलब्ध होणार आहे.

         

            नुकताच खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने ठाणे जिल्हा सत्र न्यायालयातील वाचनालयात पाच संगणक पुरविले होते. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ठाणे डिस्ट्रिकट कोटर्स बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत कदम तसेच वकील संघटनेचे सर्व सभासदांनी खासदार राजन विचारे यांच्याकडे ठाणे महानगर पालिके मार्फत लस देण्याची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे खासदार राजन विचारे यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ बिपिन कुमार शर्मा यांच्याशी चर्चा करून त्यांना पत्र दिले. 


            त्यावर ठाणे महापालिकेचे आयुक्त यांनी दखल घेऊन तात्काळ वाडीया दवाखाना, टेंभी नाका, ठाणे येथे लस देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे असे पत्र खासदार राजन विचारे यांना दिले आहे. उद्या ठाणे लोकसभेचे खासदार श्री. राजन विचारे, ठाणे महापालिकेचे नरेशजी म्हस्के, उप महापौर सौ. पल्लवी कदम, ठाणे महापालिकेचे आयुक्त मा. डॉ. विपिन शर्मा, उप आयुक्त श्री. संजय हेरवाडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Post a Comment

0 Comments