लोकग्राम पादचारी पुलाच्या पाड कामास सुरुवात खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठ पुराव्याला यश


■शिव सैनि कांनी केली पुलाच्या पाड कामाची पाहणी  जून शेवटपर्यंत पाडकाम पूर्णत्वासलगेचच होणार नवीन पुलाच्या बांधकामास सुरुवात....


 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पूर्वेच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लोकग्राम पादचारी पुलाच्या कामाला गती मिळाली असून हा पूल कल्याण रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी जिव्हाळ्याचा विषय बनला होता. हा पूल धोकादायक झाल्याने तो पादचाऱ्यांच्या रहदारीसाठी काही कालावधीपासून बंद ठेवण्यात आला होता. या पुलाच्या पाडकामास आज पासून सुरुवात झाली असून या कामाची आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी कल्याण पूर्व शिवसेना सहसंपर्क प्रमुख शरद पाटील, नगरसेवक महेश गायकवाड, निलेश शिंदे, नवीन गवळी, शिवसेना उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे, उमेश शेट्टी, महादेव रायभोळे, प्रशांत बोटे, दिलीप दाखीनकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.   


 या पूलाचे काम लवकर मार्गी लागावे यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. पुलाच्या बांधकामासाठी ७८ कोटींची आवश्यकता होती परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हतेव सदर पूलासाठी कल्याण स्मार्ट सिटी प्रकल्पांअंतर्गत निधीची उपलब्धता होणेस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे नेहमीच आग्रही होतेत्यासाठी स्वतः पाठपुरावा करून शासनाकडून क.डों.म. पालिकेस निधी उपलब्ध करून देऊनरेल्वे प्रशासनाकडे वर्ग करण्याकरिता खासदार डॉ. शिंदे यांना यश प्राप्त झाले.


आजपासून लोकग्राम येथील पादचारी पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली असून जून शेवटपर्यंत पाडकाम पूर्णत्वासव लगेचच नवीन पुलाच्या बांधकामास सुरुवार होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पाडकाम संपण्याच्या आत पादचारी पूलाच्या बांधकामाची निविदा देखील रेल्वेकडून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणारत्यामुळे पाडकाम संपताच नव्या पादचारी पुलाच्या बांधकामाची निविदाप्रक्रिया पुढील महिन्यात पूर्ण करून लगेच नवीन पुलाच्या बांधकामास सुरुवात करण्यात कोणताही अडथला व विलंब होणार नसल्याचे कल्याण पूर्व शिवसेना सहसंपर्क प्रमुख शरद पाटील सांगितले.

Post a Comment

0 Comments