भिवंडी जुने झाड घरासह ४ दुकानावर पडले, दुकानाचे नुकसान, एक दुचाकी स्वार जखमी
भिवंडी ,  प्रतिनिधी :  शहरातील नजराणा कंपाउंड येथील सुभाष गार्डन जवळ जुने अशोकाचे झाड ३  दुकाने आणि एका घरावर पडले असून त्यामध्ये स्वीट, टेलर आणि पानटपरी या दुकानाचे मोठे नुकसान झाले असून एक दुचाकीस्वार जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मात्र हे झाड रोडवर पडल्याने वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती,अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून झाड हटवण्याचे काम सुरु असून ,सुदैवाने गार्डनमध्ये हे झाड कोसळले नाही कारण आज लहान मुले मोठ्या प्रमाणात खेळण्यासाठी आले होते त्यामुळे  मोठी दुर्घटना झाली असती मात्र हे झाड पडले कि पडले असा प्रश्न नागरिक विचारत आहे...

Post a Comment

0 Comments