भिवंडी लोकसभा मतदार संघातील स्वॅब सेंटर, फिव्हर क्लिनिक सुरू करा खासदार कपिल पाटील यांची जिल्हाधि काऱ्यांकडे मागणी

भिवंडी, दि. २४ (प्रतिनिधी) : कोरोनाच्या तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड, कल्याण ग्रामीण, वाडा तालुक्यातील स्वॅब सेंटर व फिव्हर क्लिनिक तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी भाजपाचे खासदार कपिल मोरेश्वर पाटील यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांच्याकडे केली आहे.


          कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर, भिवंडी लोकसभा मतदारसंघात कोरोनाच्या संशयित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, राज्य सरकारने सुरू केलेले स्वॅब सेंटर व फिव्हर क्लिनिक बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे संशयित रुग्णांना ग्रामीण भागातून स्वॅब टेस्टिंग करण्यासाठी शहरात आणावे लागते. त्यासाठी रुग्णाची ने-आण करताना नातेवाईकांची धावपळ होते. 


            त्यातच एखादा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्यास इतरांनाही
 संसर्ग होण्याची शक्यता आहे. सध्या शहरी भागात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड, कल्याण ग्रामीण, वाडा तालुक्यातील स्वॅब टेस्टिंग केंद्र व फिव्हर क्लिनिक तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी ठाणे व पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.


Post a Comment

0 Comments