कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार


■वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पार पडली के,डी,एमसी, वाहतूक विभाग आणि रेल्वेची संयुक्त बैठक...


 

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार असून हि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आज महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीला पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, ठाणे वाहतूक विभागाचे डीसीपी बाळासाहेब पाटीलरेल्वेचे एरिया मॅनेजर डॉ. प्रमोद जाधवकल्याणचे एसीपी अनिल पोवारकल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सुखदेव पाटीलकल्याण डोंबिवली महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 

स्टेशन परिसर विकास सुरु असल्याने बस डेपो विठ्ठलवाडी येथे स्थलांतरीत करण्यावर चर्चा झाली. त्याचबरोबर बेकायदा रिक्षा स्टॅण्ड हटविण्यासाठी त्याची माहिती आरटीओकडून मागविण्यात आली आहे. रस्त्यावर असलेले अनावश्यक स्पीड बेक्रेर रोड नियमानुसार काढण्यात येतील. महापालिकेकडे ४०० पार्किग प्लॉट आहे. त्याची यादी पोलिसांना देण्यात आली आहे. ते तो प्लॉट निश्चीत करुन त्याठिकाणी पे अॅण्ड पार्क तयार केले जातील. स्टेशन परिसर विकासाचे काम सुरु असल्याने रेल्वेच्या ब्रेक्समन चाळीत पार्किगसाठी रेल्वेने जागा द्यावी अशी मागणी करण्यात आली. 


 

कल्याण डोंबिवलीतील मुख्य रस्त्यांवरील वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. त्यातही इथल्या रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी तर सर्वांसाठीच डोकेदुखीचा विषय ठरत आहे. विशेषतः इथल्या रिक्षा स्टँडबाबत सर्वाधिक तक्रारी आल्याचे सांगत लवकरच वाहतूक पोलीसरेल्वे अधिकारी आणि रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील रिक्षा स्टँडची पाहणी केली जाणार आहे. तर स्टेशन परिसरात या रिक्षांच्या गर्दीमुळे आत जाताना आणि बाहेर पडताना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामूळे नागरिकांना स्टेशनवर सोयीस्करपणे ये-जा करण्याबाबतमीटरनूसार रिक्षा चालण्याबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचेही डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.आणखी ५ चौकात सिग्नल यंत्रणा सुरू केली जाणार असून त्यापैकी 3 चौकातील सिग्नल व्यवस्थेचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील साईन एजेसस्पीडब्रेकर्सफेरीवालेविठ्ठलवाडी बस स्टॅण्ड आदी महत्वाच्या विषयांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments