आगा खान एजन्सी फॉर इंडिया व भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेच्या वतीने ''जागतिक जल दिन'' साजरा
भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) पाणी ही आपली मूलभूत गरज आहे. याचे महत्व जाणून आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया या संस्थेच्या वतीने (एच.बी. सी. सी) या प्रकल्पाअंतर्गत भिवंडी निजामपूर शहर  महानगरपालिकेच्या सौजन्याने दिनांक  २३ मार्च व २४ मार्च  २०२१ रोजी ''जागतिक जल दिन'' साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाट्न  भिवंडी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी हेमंत गुळवे यांच्या हस्ते करण्यात आले. 


             स्वच्छता रथाद्वारे भिवंडी शहरातील जनतेला पाण्याचे महत्व ,तसेच स्वच्छतेबद्दल ,वारंवार हात धुण्याबद्दल,मास्क योग्य रितीने वापरण्याबद्दल  संदेश देण्यात आला. तर स्वच्छता  रथ हा भिवंडी  शहरातील  ५  प्रभाग समित्यामध्ये फिरवण्यात आले. यावेळी  भिवंडी  शहरातील  सर्व प्रभाग समितीचे  स्वच्छता निरीक्षक  उपस्थित होते.  तसेच आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियाच्या  एरिया मॅनेजर प्रियंका  मोकळे, बीसीसी ऑफिसर प्रतिक खैरनार, पॅरा वर्कर अनिश जाधव ,विशाल जाधव उपस्थित होते. यावेळी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments