ज्ञानसाधना कॉलेज ते गुरूद्वार भास्कर कॉलनी यादरम्यान पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात खासदार राजन विचारे
ठाणे ,  प्रतिनिधी  : -  हायवे पूर्व द्रुतगती मार्गावर ज्ञानसाधना कॉलेज ते गुरूद्वार भास्कर कॉलनी या दरम्यान पादचारी पुलाच्या कामाला रात्री उशिरा सुरुवात झाली. त्यावेळी खासदार राजन विचारे, महापौर नरेश म्हस्के मस्के, नगरसेवक विकास रेपाळे, एम एम आर डी एचे अधिकारी यांच्या उपस्थित पुलाच्या कामाचे पूजन करून कामास सुरुवात केली.


सदर पुलाची लांबी 68.765 मीटर असून हा पुल दोन भागात असून ज्ञानसाधना कडील पुलाची लांबी 21.795 मीटर व नौपाडा भास्कर कॉलनी कडील पुलाची लांबी 43.37 मीटर असून सदर पुलाची रुंदी 3 मीटर आहे. काल रात्री ३:०० वाजेपर्यंत ज्ञानसाधना कडील बाजूस असलेल्या पूल 2 क्रेनच्या साहाय्याने ठेवण्यात आला. तसेच नौपाडा येथील पुल बसवण्यासाठी तांत्रिक अडचणीमुळे हा पूल सोमवारी मध्यरात्री बसविण्याचे ठरले आहे.


या पुलाचे उर्वरित काम 31 मार्चपर्यंत पूर्ण होऊन सदर पादचारी पूल नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्ञानसाधना कॉलेज येथील विद्यार्थ्यांना व येथील ज्येष्ठ नागरिकांना तीन हात नाका येथून वळसा मारून जावे लागत होते तो त्रास कमी होणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी व अपंगांसाठी याठिकाणी लिफ्टची सोय करावी अशी मागणी खासदार विचारे यांनी त्यावेळी केली. 


या कोपरी पुलाच्या रॅमचे काम 20 एप्रिल पर्यंत पूर्ण होऊन हा पुल लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मधल्या पुलाचे काम सुरू होणार आहे अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी त्यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments