भिवंडीत फर्निचर गोदामास आग ,आगीत सर्व फर्निचर जळून खाक...
भिवंडी : दि.९ (प्रतिनिधी ) भिवंडी शहरा सोबत ग्रामीण भागात आगी च्या घटना काही थांबत नसून ओरत्येक दिवशी कोठे ना कोठे आग लागण्याची घटना घडत आहे .आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास कशेळी ग्रामपंचायत हद्दीतील चामुंडा कंपाऊंड येथील श्री जी फर्निचर च्या गोदामास भीषण आग लागली.नजीक च्या इमारती मध्ये असलेले गोदाम या नव्या इमारती मध्ये स्थलांतरीत करीत असताना त्या ठिकाणी वेल्डिंग काम सुरू होते त्याची ठिणगी उडून या गोदामात साठविलेले फोम ,प्लायवूड, हार्डबॉर्ड, असे साहित्य असल्याने त्याने लगेच पेट घेतल्याने या आगीत गोदमतील संपूर्ण फर्निचर साहित्य जळून खाक झाले आहे .या घटनेची माहिती कळताच ठाणे अग्निशामक दलाची एक गाडी एक पाणी टँकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन तासाने ही आग आटोक्यात आणली.

Post a Comment

0 Comments