वडवली उड्डाण पुलाचे मनसेकडून उद्घाटन मात्र वालधुनी पुलाच्या उद्घाटनाला पोलिसांचा 'खो
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  मोहने येथील वडवली उड्डाण पुल व वालधुनी पुलाचे होणारे उद्घाटन सोमवारी लांबणीवर पडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील शेकडो कार्यकर्त्यांच्या फौज फाट्या सह येवून वडवली उड्डाण पुलाचे उद्घाटन केले त्याच बरोबर वालधुनी पुलाचे उद्घाटन पोलिसांनी आडवी व्हॅन लावून विरोध दर्शविल्याने या पुलाचे उद्घाटन मात्र होऊ शकले नाही. यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईरशहर अध्यक्ष कौस्तुभ देसाईस्थानिक नगरसेविका सुनंदा कोटनगरसेविका कस्तुरी देसाईमनसे उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, राहुल कोट आदी पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

    आज कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या दोनही पुलाचे राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतेमात्र त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच भिवंडीतील लोकसभा खासदार कपिल पाटील यांचा लोकसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न असल्याने ते उपस्थित राहणार नसल्याचे पालिका प्रशासनाला कळविण्यात आल्याने आजचा नियोजित उद्घाटन व लोकार्पण सोहळा पालिका प्रशासनाला रद्द करावा लागला.


        यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी उद्घाटन पुढे ढकल्याचे समजताच शेकडो कार्यकर्त्यांनसह प्रशासनाच्या व राज्यकर्त्यांचा निषेध करून वडवली उड्डाण पुल सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला केल्याचे जाहीर केले. रेल्वे व पालिका प्रशासनाने अकरा वर्षात पुल बांधला. मंत्र्यांना या पुलाचे उद्घाटन करण्यास फुरसत नसल्याचे सांगून पाटील म्हणाले की आम्ही कार्यकर्त्यांना घेऊन औपचारिकरित्या उद्घाटन केले असल्याचे सांगितले.

       

             दरम्यान मुरबाड रोड मधील वालधुनी नाल्यावर बांधण्यात आलेल्या पुलाच्या उद्घाटनाला पोलिसांनी विरोध दर्शविल्याने या पुलाजवळ पोलिसांनी पोलीस व्हॅन आडवी लावल्याने उद्घाटन सोहळा होऊ शकला नाही. मनसे आमदार राजू पाटील यांनी वडवली पुलाचे औपचारिकरित्या उद्घाटन केले मात्र अर्ध्या तासातच वडवली पुल वाहतुकीकरिता पोलिस बंदोबस्तात बंद केल्याचे दिसून आलेपोलिसांनी नेमके कोणाच्या आदेशाने वाहतूकीसाठी सुरू करण्यात आलेला पुल बंद केला याबाबत नागरिकांमध्ये येथे मोठा संभ्रम यानिमित्ताने उभा ठाकला  आहे.


Post a Comment

0 Comments