पालिका आयुक्तांनी केला केडीएमसीचा अर्थसंकल्प सादर

■आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण, पायाभूत सुविधांसह शहरी गरिबांसाठी विशेष तरतूद ......


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ३३० कोटी ९६ लाख रुपये आरंभी शिलकी असलेले  १५९१ कोटी ८४ लाख जमा व १२६० कोटी ८९ लाख खर्चाचे सन २०२०,२१ चे सुधारित अर्थसंकल्प तसेच आगामी २०२१,२२  च्या आर्थिक वर्षासाठी १७०० कोटी २६ लाख जमा व १६९९ कोटी २७ लाख खर्चाचे ९९ लक्ष रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर करून मंजूरही केले.


       सन २०२०,२१ चे मंजूर अंदाजपत्रक पहाता मागील ७८३ कोटी १० लाख रुपयांनी उत्पन्न घटले असून १११३ कोटी ९५ लाख रुपये खर्चाला कात्री लावल्याचे दिसून येत आहे. आगामी २०२१,२२ च्या मंजूर तरतुदी पेक्षा ६७५ कोटी ५७ लाखांनी घसरलेले दिसत आहे. आगामी वर्षांमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेलाच महत्व देण्यात आले आहे. गतवर्षी कोरोनासाथीवर १३५ कोटी खर्च झाले असून आगामी वर्षातही सुरू रहाण्याची शक्यता विचारात घेऊन ९७ कोटी १० लाखांची त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.


२५ दवाखाने सुरू करणेटिटवाळा शक्तीधाम व वसंतव्हॅली येथे नविन रुग्णालये सुरू करण्यात येणार आहेत४ डायलेसिस केंद्रमाड्युलर ओटी कँथलँबपॅथॉलॉजी रेडिओलॉजी सुरू करणेपी.पी.पी तत्वावर वैद्यकीय नर्सिंग व आयुवर्दीक महाविद्यालय उभारणे,सार्वजनिक स्वच्छतेसाठी सुधारणा करून राहण्याजोगे शहर बनविण्यासाठी सुधारणा करणेकर्मचारी  प्रशिक्षणसेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुलभताक्लस्टर योजना राबविणेनविन प्रशासकीय भवन बांधणेनागरी सुविधा केंद्रे स्मार्ट करणेथिंक टँक स्कीम राबविणेरस्ते व शहर सौंदर्यीकरण करणेस्मार्ट सिटी अंतर्गत कामांना गती देणेनौदल आर्ट गॅलरी उभारणेउल्हास नदी किनारा सुशोभित करणे आदी प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे.


 या वर्षी कोरोनाची महामारी संपली नसल्यामुळे आरोग्य व्यवस्था ही केंद्र स्थानी करुन बजेट सादरीकरण करण्यात आले आहे. कामाची निकड व प्राधान्यक्रम ठरवून कामे करणेमहापालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळणेअनावश्यक बाबींवर खर्च टाळणेकाटकसर करणेआर्थिक स्थिती सुधारणेसाठी उपाययोजना करण्याचा मनोदयही आयुक्तांनी व्यक्त केला.


नागरिकांना त्याच्या राहत्या परिसरात व आपल्याच प्रभागात अत्यल्प दरात वैदयकीय सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे या दृष्टीने प्रत्येक प्रभाग क्षेत्रात किमान 2 आपला दवाखाना/प्रभाग दवाखाना सुरु करण्यात असून महापालिका क्षेत्रात याप्रकारचे 25 दवाखाने उभारण्याचा मानस आहे. गोरगरिब नागरिकांना अत्यल्प दरात डायलेसिसची सुविधा देण्यासाठी कल्याण येथे 2 व डोंबिवली येथे 2 अशी 4 डायलेसिस केंद्र उभारण्यात येणा आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांना माफक दरात सिटी स्कॅन/ एम.आर.आय. स्कॅन सुविधा रुक्मिणीबाई रुग्णालयात देखील उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरु आहे.


महापालिका क्षेत्रातील नागरिकांना उत्तम दर्जाची परिवहन व्यवस्था उपलब्ध करुन देण्याकरीता या अर्थसंकल्पामध्ये भांडवली खर्चाअंतर्गत रुपये 4.00 कोटीची व महसुल खर्चासाठी रुपये 35.00 कोटीची तरतुद करण्यात आली आहे. समाजातील दुर्बल घटकअनसुचित जाती व जमातीविमुक्त जाती व भटक्या जाती यांच्या कल्याणाकारी योजनांसाठी अंदाजपत्रकात रक्कम रुपये 10.66 कोटीची तरतुद करण्यात आली आहे.


शहराचे विकासासाठी विविध प्रकारचे विकास प्रकल्प महापालिकेमार्फत राबविले जात असून असे प्रकल्प राबविण्यासाठी तसेच शहरातील विविध समस्या लोकसहभागातून सोडविण्यासाठी विशिष्ट समस्याचा सखोल अभ्यास व संशोधन करण्यासाठी संबंधित विषयातील " विचारगट" Think Tank तयार करण्याचा मानस आहे. या विचारगटासोबत नियमित बैठका घेवून शहराच्या समस्या मार्गी लावण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहे.

Post a Comment

0 Comments