गरोदर मातांचे सामूहिक ओटीभरणसकारात्मक विचार गरोदर महिलांना बनवेल निरोगी -  डॉ जे पी शुक्ला .....
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कल्याण ग्रामीण मार्फत पंचायत समिती सेस फंड अंर्तगत ७व्या व ९व्या महिन्याच्या गरोदर मातांसाठी  आरोग्य व आहार प्रशिक्षण, ओटी भरण कार्यक्रम नुकताच श्रीमती जी.आर.सी. हिन्दी हायस्कूल पिसवली येथील प्रांगणात पार पडला.


या कार्यक्रमा करिता डॉ जयप्रकाश शुक्ला डॉ छाया सूर्यवंशीप्रगती भोईरनिलम भोईर, जी.आर.सी. हिन्दी  हायस्कूल पिसवलीच्या मुख्याध्यापिका पुष्पा शुक्ला, मते कीर्तनकारसरोदे यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी मातांच्या ओटीत नारळ, शेंगदाणेगुळखजूरहिरवे मूगमटकी, खोबरे व आयोडीन युक्त मीठब्लाऊज पीस आदी सर्व प्रकारच्या पौष्टीक मातेला व तिच्या बाळाला उपयुक्त अशा गोष्टीने मातांची ओटी भरण्यात आली.


साई होमिओपॅथी मेडिकल कॉलेज नित्यानंद हॉस्पिटलचे एसोसिएट प्रोफेसर डॉ जेपी शुक्ला यांनी या प्रसंगी गरोदर महिलांना आरोग्य व गर्भ संस्कार बद्दल माहिती दिलीसकारत्मक विचार, योग्य आहार, योग साधना केल्यास प्रसूति वेदना होणार नसल्याचे डॉ शुक्ला यांनी सांगितले. उपस्थित मातांना डॉ जयप्रकाश शुक्ला व डॉ छाया सूर्यवंशी यांनी आरोग्य आहार विषयक माहिती दिली.


मते यांनी कीर्तनाच्या माध्यमातून पुराणातली दाखले देऊन कशी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांना पॅकिंग फूड देण्यात आले. आजदे १ बिट पर्यवेक्षिका उषा लांडगे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. ह्या कार्यक्रमा करीत पिसवली येथील सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. 

Post a Comment

0 Comments