पश्चिम बंगाल मध्ये शिवसेना ममता बॅनर्जींच्या पाठीशी

 

■भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेकडून उमेदवार नाही  - शांती दत्ता (पश्चिम बंगाल शिवसेना प्रमुख)

कल्याण , कुणाल म्हात्रे : पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ममता बॅनर्जींच्या पाठीशी उभी राहणार असून ममता बॅनर्जी यांच्या विजयासाठी शिवसेना एकही उमेदवार देणार नसल्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल शिवसेना प्रमुख शांती दत्ता यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून भाजपाला रोखण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी ममता बॅनर्जीं यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याची माहिती शांती दत्ता यांनी दिली.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर दत्ता हे कल्याणच्या शासकीय विश्रामगृहात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश माजी सचिव नोवेल साळवे यांची भेट घेत राजकारणासहित अनेक विषयांवर चर्चा केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वल्ली राजनराम वीररमेश गंगावणेपास्टरसुबुलन माळी, विजय चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.


पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका असून या निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासाठी परवानगी मागण्यासाठी पश्चिम बंगाल शिवसेना प्रमुख शांती दत्ता यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र पश्चिम बंगालमध्ये भाजपा आपल्या सर्व ताकदीनिशी उतरली असून ममता बॅनर्जी यांना पाठींबा देण्यासाठी याठिकाणी शिवसेना आपले उमेदवार उभे करणार नसल्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. 


याआधी पश्चिम बंगालमध्ये १०० ठिकाणी उमेदवार उभे करण्याची तयारी केली होती. मात्र पक्षाच्या निर्णयानुसार ममता बॅनर्जी यांना मदत करण्यात येणार असल्यायचे शांती दत्ता यांनी सांगितले .दरम्यान भाजपा आपल्या केंद्रात असलेल्या सत्तेच्या ताकदीचा वापर करून पैशांच्या जोरावर याठिकाणी निवडणूक लढत असून सरकारी कंपन्या विकून भाजपा शांत बसणार नसून आगामी काळात भाजपा संपूर्ण देश देखील विकेल अशी टीका शांती दत्ता यांनी यावेळी केली. 


Post a Comment

0 Comments