प्लास्टिक मुक्त डोंबिवली` बनविण्या साठी सक्षम नारी महिला बचत गटाचा हातभार..

   डोंबिवली ( शंकर जाधव ) खरेदी करताना आपण हमखास दुकानदारां कडून पिशव्या मागतो.दुकानदारही ग्राहकांना समान ठेवण्यासाठी प्लास्टिक पिशव्या देतो.मात्र आता हे चित्र बदलल्याचे दिसते.डोंबिवलीतील स्टेशनबाहेरील दुकानात समान घेऊन जाताना एकतर ग्राहकांना स्वतः कापडी पिशव्या घेऊन जावे लागेल अथवा दुकानदारांकडून कापडी पिशव्या मिळतील.`प्लास्टिकमुक्त डोंबिवली`बनविण्यासाठी सक्षम नारी महिला बचत गटाचा हातभार लागल्याने प्रशासनाला अधिकच कामात उत्सुकता आली आहे.  


    कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत कचराप्रश्नावर महासभा गाजल्या होत्या. नागरिकांचे सहकार्य मिळत नाही आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे दुर्लक्ष हे त्यामागचे प्रमुख आरोप असल्याचे लोकप्रतिनिधींचा आरोप होता. रामदास कोकरे यांनी घनकचराव्यवस्थापन उपायुक्त पदभार स्वीकारल्यावर कचराप्रश्न अर्धाधिक सुटला. `प्लास्टिकचा वापर करू नका` असे आवाहन करणाऱ्या पालिका प्रशासनाला महिला बचत गटांची साथ लाभल्याने प्लास्टिक बंदीवर वापरावर काही प्रमाणात यश आले आहे.एकीकडे प्रत्येक सोसायटी आणि चाळींतून ओला-सुका कचरा वर्गीकरण करून पालिकेकडे देणे बंधनकारक केल्याने याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळताना दिसतो.


तर दुसरीकडे दुकानदारांना आणि फेरीवाल्यांना ग्राहकांना कापडी पिशव्या देणे बंधनकारक केले आहे.बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी दुकानदारांना, फेरीवाल्यांना व नागरिकांना सक्षम नारी महिला बचत गट वतीने वाजवी भावात कापडी पिशव्या उपलब्ध करून देणे.जास्तीत जास्त कापडी पिशव्यांचे वितरण कमी प्रभाग क्षेत्र अधिकारी यांनी कापडी पिशवी वितरनाकडे विशेष लक्ष घालून आरोग्य निरीक्षक, मुकादम, फेरीवाले पथक यांनी स्वतंत्र पथक बनविण्याचे यांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना लेखी निर्देश घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिले आहे.सोमवारी पालिकेचे स्वतंत्र पथक आणि सक्षम नारी महिला बचत गटाच्या संचालिका स्वाती मोहिते यांनी डोंबिवली पूर्वेकडील `ग`प्रभाग क्षेत्र हद्दीतील स्टेशनबाहेरील दुकानदारांना कमी दारात कापडी पिशव्या दिल्या.गेल्या तीन महिन्यात सदर बचत गटाच्या वतीने १० हजार कापडी पिशव्या दुकानदारांना देण्यात आल्या.

  

Post a Comment

0 Comments