Header AD

बी.के. बिर्ला महाविद्याल याचा आभासी माध्यमातुन आत्मसंरक्षण शिबिरात विक्रमाचा प्रयत्न
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : व्यवस्थापन विभागबी.के. बिर्ला (स्वायत्त) कल्याण व्दारे महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थीनींना प्रोत्साहित व प्रशिक्षित करण्यासाठी प्राथमिक स्वसंरक्षण उपक्रम सोमवारदि. ८ मार्च२०२१ रोजी आभासी पद्धतीने राबवण्यात आला. विभागाने एक मोठा उपक्रम सकाळी १०.१५ ते १०.५० (४५ मि.) "सर्वात जास्त प्रशिक्षणार्थी - आभासी शिबिर" या शिर्षकाखाली मायक्रोसॉफ्ट टीम माध्यमातून आयोजित केला.


महाविद्यालयाचे हे उपयोजन आहे की याची नोंद लिमका बुक मध्ये घेण्यात यावी व आत्मसंरक्षणाचे धडे व महत्त्व समाजात सर्व घटकांपर्यंत जावे. यामध्ये एकुण २९१ मुली व ७ अध्यापकांनी आपला सहभाग नोंदवला. या आभासी शिबिराची सुरुवात हलक्याशा व्यायामाने मार्गदर्शक रेवती हुंसवाडकर (आंतरराष्ट्रीय तायक्वोंडो खेळाडूराष्ट्रीय पंच आणि डॅन ब्लॅक बेल्ट) यांनी तीन प्रकारचे कौशल्यदोन प्रकारचे स्वसंरक्षण आणि तीन प्रकारच्या मुष्ठी प्रात्यक्षिकांद्वारे स्वसंरक्षणाची ओळख करून दिली.


या शिबीराचा उपयोग आत्मविश्वास व सकारात्मक व्यक्तित्व घडवण्यासाठी होईल. याचे प्रयोजन ओ. आर. चितलांगे (अध्यक्षव्यवस्थापन समितीबी.के. बिर्ला)संचालक डॉ. नरेशचंद्रप्राचार्य डॉ. अविनाश पाटिलउपप्राचार्या इस्मिता गुप्ताविभाग प्रमुख अनिल तिवारी आणि सहकारी अध्यापक अरनॉल्ड जथानासुरज अगरवालारिंकी राजवानी आणि नव्या प्रेमदर्श यांच्या पुढाकाराने झाले.

बी.के. बिर्ला महाविद्याल याचा आभासी माध्यमातुन आत्मसंरक्षण शिबिरात विक्रमाचा प्रयत्न बी.के. बिर्ला महाविद्याल याचा आभासी माध्यमातुन आत्मसंरक्षण शिबिरात विक्रमाचा प्रयत्न Reviewed by News1 Marathi on March 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads