मुंबई, पुणेतील व्यापाऱ्यांना 'दुकान'ने दिला मदतीचा हात


संकटाच्या काळात व्यवसायाचे नुकसान होण्यापासून वाचविले ~


मुंबई, १६ मार्च २०२१ : महाराष्ट्रात कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या प्रतिबंधांमुळे आणि कर्फ्यूमुळे प्रभावित होण्याची शक्यता असलेल्या मुंबई, पुणेतील व्यापाऱ्यांना त्यांचा व्यवसाय ऑनलाईन सुरु करता यावा, चालवता आणि वाढवता यावा यासाठी कार्यरत असलेल्या ‘दुकान’ या प्लॅटफॉर्मने खूप मोठा हात दिला आहे. ‘दुकान’मुळे तंत्रज्ञानाची विशेष माहिती नसलेले व्यापारी देखील स्मार्ट फोनवर तीस सेकंदांपेक्षा कमी वेळात ऑनलाईन स्टोर तयार करू शकतात आणि आपल्या ग्राहकांना खरेदीचा अधिक चांगला अनुभव मिळवून देऊ शकतात. ‘दुकान’ हा प्लॅटफॉर्म व्यापाऱ्यांना खात्री देतो की संकटाच्या काळात देखील हा स्वदेशी प्लॅटफॉर्म त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ देणार नाही.


‘दुकान’ने सुरुवातीपासूनच व्यापाऱ्यांना अॅपमार्फत आपले व्यवसाय दीर्घकाळपर्यंत नीट चालावेत यासाठी मदत केली असून कर्फ्यूसारख्या संकटाच्या काळातही त्यांना भक्कमपणे उभे राहण्यात मदत केली आहे. किराणा सामानांपासून फळे व भाज्या, इलेक्ट्रॉनिक्स, खाद्यपदार्थांची डिलिव्हरी इत्यादी अनेक व्यापाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. २०२० च्या अखेरीपासून हे व्यापारी ‘दुकान’ अॅपमार्फत महाराष्ट्रातील ४ लाखांहून जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू शकले आहेत.


‘दुकान’ अॅप व्यापाऱ्यांना डिजिटल होण्यात मदत करते, याठिकाणी व्यापारी आपले ऑनलाईन स्टोर सुरु करू शकतात, सोशल मीडिया चॅनेल्सचा उपयोग करून आपली उत्पादने व सेवा आपल्या सुविधेप्रमाणे विकू शकतात. हे सर्व ते फक्त आपला स्मार्टफोन वापरून करू शकतात. जेव्हा एखादा व्यापारी ‘दुकान’ अॅपवर नोंदणी करतो तेव्हा त्याला एक कस्टमाइज्ड स्टोर लिंक मिळते, या लिंकवर तो आपली उत्पादने व सेवा इष्ट ग्राहकवर्गासमोर प्रदर्शित करू शकतो. थेट ऑर्डर्स मिळवण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील हे शेअर करता येते.


‘दुकान’ अॅपवर नोंदणी केलेल्या व्यापाऱ्यांना त्यांनी केलेल्या विक्रीची पेमेंट्स त्वरित आणि अगदी विनासायास पद्धतीने मिळवता येतात. यासाठी यामध्ये नवीन वैशिष्ट्य समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामुळे कोणतेही प्रोसेसिंग शुल्क किंवा व्यवहारांसाठी फी द्यावी लागत नाही. आता या वैशिष्ट्यामुळे २७ लाख व्यापारी त्यांच्या ग्राहकांकडून संपर्कविना पेमेंट्स मिळवू शकत आहेत. ‘दुकान’च्या नवीन ऑनलाईन पेमेंट वैशिष्ट्यामुळे व्यापाऱ्यांना त्यांचे बँक खाते आणि युपीआय आयडी एकीकृत करून त्यांच्या उत्पादने व सेवांची पेमेंट्स कोणतीही मर्यादा न येता मिळवता येतील.

Post a Comment

0 Comments