वालीव येथे संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात १४० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

 कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  मानवसेवेच्या कार्यामध्ये सदोदित अग्रेसर असलेल्या संत निरंकारी मिशनच्या वतीने रविवारी  संत निरंकारी सत्संग भवनवालीव येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १४० निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तदात्यांमध्ये २० महिलांचाही समावेश आहे. रक्त संकलनाचे कार्य संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्ले यांच्याकडून करण्यात आले.


      संत निरंकारी मिशनच्या वर्तमान प्रमुखसद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार मागील काही महिन्यांपासून संत निरंकारी मिशनच्या वतीने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली रक्तटंचाई दूर करण्यासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये मोठ्या संख्येने निरंकारी भक्तगण भाग घेत आहेत. मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये मिशनच्या वतीने आतापर्यंत सुमारे ३००० युनिट इतके रक्तदान करण्यात आले आहे.


      वालीव येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन मंडळाचे नाशिक क्षेत्राचे क्षेत्रीय प्रभारी जनार्दन पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी वालीवचे शिवसेना शाखाप्रमुख दिलीप धनगरजगदीश पाटीलवसई विकास मंडळाचे माजी नगरसेवक किशोर धुमाळसारंग मित्रमंडळाचे प्रमुख राहूल घरतस्थानिक व्यावसायिक व कार्यकर्ते.जगदीश सुतार यांच्यासह संत निरंकारी मंडळाचे स्थानिक मुखीसेवादल अधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.  हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन आणि संत निरंकारी सेवादलच्या स्वयंसेवकांनी महत्वपूर्ण योगदान दिले.   

Post a Comment

0 Comments