भिवंडी पालिकेची भाजप ठाणे जिल्हा ग्रामीण युवा मोर्चा कार्याल यावर तोडक कारवाई


भिवंडी दि ११ (प्रतिनिधी  ) पालिकेचे नगरसेवक सुमित पाटील यांचे निकटवर्तीय भावेश पाटील यांच्या कार्यालयावर भिवंडी मनपाचा हातोडा पडला. भिवंडी महानगरपालिकेने संपूर्ण भिवंडी शहरात अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाईला सुरुवात केली आहे शहरातील अनेक अनधिकृत बांधकामांवर भिवंडी मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी आदेश दिल्यानंतर भिवंडी शहरातील अनेक भागात अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास महानगरपालिकेने सुरुवात केली आहे. 


भिवंडी महानगरपालिकेने अजय नगर येथील भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण चे उपाध्यक्ष भावेश पाटील यांच्या कार्यालयावर हातोडा चढवीत कारवाई केली यामध्ये भावेश पाटील यांच्या कार्यालयाची संपूर्णपणे जेसीबी लावून हे कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले व शेजारीच असणार्‍या नर्सरी वरही भिवंडी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. यावेळी भिवंडी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments