कल्याण डोंबिवलीत १९८ नवे रुग्ण

 कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात आज १९८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही.      आजच्या या १९८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६,८२३ झाली आहे. यामध्ये २१०३ रुग्ण उपचार घेत असून ६१,५४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


          

          आजच्या १९८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-५१,  कल्याण प – ५५डोंबिवली पूर्व ६३डोंबिवली प – १७तर मांडा टिटवाळा येथील १२  रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments