ॲड. प्रकाश आंबेडकर घेणार एन.आर.सी आंदोलन कर्त्यांची भेट
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : मोहने येथील एन.आर. सी कंपनीच्या कामगार व महिला वर्गाने येथे तंबू ठोकून आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्याकरिता गेल्या वीस-बावीस दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या  आंदोलनाला विविध सामाजिक संस्था तसेच राजकीय नेते भेट देत आहेत.


वंचित बहुजन आघाडीचे सर्वोसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर गुरुवारी दुपारी आंदोलनकर्त्यांच्या भेटीस येत असल्याने पोलीस प्रशासनही गडबडले आहे. यापूर्वी मनसे आमदार राजू पाटील, शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार, तसेच नुकतेच राज्याचे सार्वजनिक नगर विकास मंत्री तसेच पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली होती. तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची देखील कामगारांच्या शिष्टमंडळाने भेट देऊन निवेदन सादर केले होते.


         गेल्या बारा वर्षापासून एन.आर.सी कारखाना बंद पडल्याने कामगार वर्ग अंतरित लढाई लढत आहे. येत्या पाच तारखेला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी अदानी व एन. आर.सी व्यवस्थापना समवेत कामगार नेत्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर ठेवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता कामगारांना न्याय देण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आंदोलनकर्त्यांची भेट घेणार असल्याने प्रशासनाच्या देखील भुवया उंचावल्या आहेत. ॲड. आंबेडकर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणावर टीकेची झोड उठवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Post a Comment

0 Comments