नागरिकांनी कर भरून पालिकेस सहकार्य करावे, पुढील कारवाई टाळावी - आयुक्त डॉ.पंकज आशियाभिवंडी दि 26( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक 23 मार्च  2021 पर्यंत थकबाकीची रक्कम न भरणाऱ्या थकबाकीदारांकडून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 128  अन्वये प्रभाग समिती निहाय   प्रत्येकी पाच या प्रमाणे एकूण 25 मालमत्तांचे अटकावणी  करून जप्ती व तदनंतर लिलावाद्वारे रक्कम वसूल करण्याची कार्यवाही प्रस्तावित  आहे. तसेच थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर केलेल्या धडक  कारवाईत  1000 नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहेत.


          भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिकेमार्फत अभय योजना टप्पा मुदतवाढ  क्र.3 दिनांक 31 मार्च  2021 रोजी पर्यंत  मालमत्तेवरील कर एक रक्कमी भरल्यास शंभर टक्के व्याज माफी देण्यात येत आहे, तरी 31 मार्च 2021 पर्यंत जे मालमत्ताधारक महापालिकेकडे मालमत्ता कर भरणा भरणा करणार नाहीत अशा मालमत्ता धारकांकडून मालमत्तांच्या लिलावाद्वारे रक्कम वसूल करण्याची कारवाई माहे एप्रिल 2021 मध्ये करण्यात येणार आहे.          त्यानुसार भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येत आहे की,  सर्व नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात अभय योजना कालावधी संपूर्ण कर  भरून व्याजमाफीचा लाभ घ्यावा व महानगरपालिकेस् सहकार्य करून पुढील कारवाई टाळावी, असे आवाहन पालिका आयुक डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे. मालमत्ता करातून मिळणारा उत्पंनामुळे  महापालिका क्षेत्रात विविध विकास कामे,  प्रकल्प कामे ,  नगरसेवक निधी, प्रभाग निधी प्रभाग सुधारणा निधी  इत्यादी माध्यमातून निधी उपलब्ध होऊ शकेल, तरी नागरिकांनी आपल्या शहराचा विकासाकरता कर भरून महापालिकेस सहकार्य करायचे आहे व पुढील कारवाई टाळावी,  असे आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया  यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments