भिवंडी महानगर पालिकेत जागतिक क्षय रोग दिन साजरा
भिवंडी , प्रतिनिधी  :  क्षय रोग हा एक साधा आजार नसून तो गंभीर स्वरूपाचा आजार आहे. वेळच्यावेळी जर उपचार केले नाहीत तर या आजारात मृत्यू देखील येऊ शकतो.  याकरिता क्षय रोग लक्षण दिसताच तातडीने वैद्यकीय उपचार करणे आवश्यक आहे, शासनाच्या सर्व वैद्यकीय आरोग्य विभागात क्षय रोगावर मोफत औषध उपचार केले जातात, तरी सर्व क्षय रोग रुग्ण  यांनी तातडीने औषध घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन पालिका मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी   डॉ.कारभारी  खरात यांनी काढले. 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी डॉ.खरात बोलत होते.यावेळी माजी नगरसेवक, ज्येष्ठ समाजसेवक गजानन शेटे, जागतिक आरोग्य संघटनेच्या ठाणे व भिवंडी विभाग क्षय रोग समन्वयक सायली तिवारी , वैद्यकीय आरोग्य अधिकारी वर्षा बारोड, डॉ.प्रिया फडके, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, राबिया गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्य डॉ. सुमया  खालिद, शिक्षिका
 तबसूम मोमीन  इत्यादी उपस्थित होते.


यावेळी डॉ.खरात यांनी क्षय रोगाची लक्षणे व तो आजार होऊ नये म्हणून प्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक आहे. तसेच क्षय रोग लक्षणे म्हणजे दिसताच तातडीने शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन औषध उपचार घेणे  , क्षय रोग झालेल्या रुग्णाला शासन प्रोत्साहनपर अनुदान रुपये 500  अनुदान देते, तसेच पोषण आहारकरिता देखील प्रतीमाह 500 रुपये अनुदान देते.


 पुढील त्रैमासिक  औषध उपचाराकरिता  रुपये 1000  मात्र अनुदान स्वरूपात दिले जाते. शासनाच्या आरोग्य विभागात क्षय रुग्णांवर मोफत औषध उपचार करून रुग्ण चांगल्याप्रकारे बरा होतो. असे देखील डॉ.खरात यांनी सांगितले.या प्रसंगी क्षयरोग झालेल्या अनेक रुग्णांनी आपली मनोगते व्यक्त केली, क्षय रोग पूर्ण  बरा होतो हे दाखवणारी बाबत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती, त्या स्पर्धेत राबिया शाळेतील विद्यार्थी यांनी सहभागी घेतला. या सर्व  विद्यार्थी यांचा लेखन साहित्य भेट देऊन सत्कार   करण्यात आला.

Post a Comment

0 Comments