राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी वल्ली राजन

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूका लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे जुने पदाधिकारी वल्ली राजन यांची पक्षाने पुन्हा एकदा जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या उपस्थितीत  त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.


वल्ली राजन हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करत असून लोकहिताचे आंदोलने, सामाजिक उपक्रम राबविले आहेत. तसेच पक्षसंघटना वाढीसाठी सक्रियपणे काम करीत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, जिल्हा अध्यक्ष जगनाथ शिंदे, कार्याध्यक्ष वंडार पाटील यांनी जी जबाबदारी दिली आहे त्याबदल वरिष्ठांचे आभार मानत असून पक्ष संघटना वाढीसाठी असेच काम करत राहणार असल्याची प्रतिक्रिया वल्ली राजन यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments