होळी आणि रंग पंचमीच्या निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे पोलिसांना निवेदन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव. दुर्दैवाने या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. या दिवशी दारु पिऊन धिंगाणा घालणेरासायनिक रंग फासणेमहिलांना पाण्याचे फुगे मारणेत्यांची छेड काढणे असे ग़ैरप्रकार होतात. 


             होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे हे ग़ैरप्रकार रोखून या सणाचे पावित्र्य राखले जावे तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सहकार्य व्हावेयासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे आयुक्तालय भागातील विविध पोलिस ठाण्यात निवेदने देण्यात आले. याच आशयाचे निवेदन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथेही देण्यात आले. ही सर्व निवेदने देताना विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.


  होळीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु बांधव आपल्या प्रथा-परंपरापासून वंचित व्हावेत यासाठी 'कचऱ्याची होळी कराअसा स्वरूपाचा अपप्रचार तथाकथित पुरोगाम्यांकडून केला जातो. हिंदू बांधवांनी अशा  प्रकारच्या अपप्रचाराला न भुलता होळीच्या निमित्ताने धर्मशास्त्रसंमत असे सात्त्विक धर्माचरण करावे. होळीच्या निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखणे हे आपले धर्मकर्तव्यच आहे. यासाठी समाजप्रबोधन कराअसे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या निमित्ताने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments