राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


   


                              

कल्याण , कुणाल म्हात्रे   :  कल्याणात कोरोना पार्श्वभूमीवर जुन्नर-आंबेगाव तालुका कल्याण-डोंबिवली रहिवासी संघाच्या वतीने ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

जुन्नर-आंबेगाव तालुका कल्याण-डोंबिवली रहिवासी संघमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती औचित्य साधत राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा २०२१ चे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे आयोजन संस्थापक सदस्य संदिप नलावडे,  सोनाली औटी,  रामचंद्र औटी,  महेंद्र हाडवळे,  स्वप्निल वाळुंज यांनी केले होते. या स्पर्धेचे परिक्षण शिवाजी जाधवसागर वाकळे यांनी केले. पारितोषिके ही संघाच्या सदस्यांमार्फत देण्यात आली.

या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला व अनेक जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभागी झाले तसेच लहानांपासून जेष्ठांपर्यंत सर्वानी आपला सहभाग या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत नोंदवला होता. अनेक निपुण वक्ते या स्पर्धेला लाभल्याने बालगट व खुलागट असे दोन गट करून एका पारितोषिकासाठी दोन स्पर्धक निवडण्यात आले. या स्पर्धेचा निकाल रविवार१४ मार्च रोजी जाहीर करण्यात आला.


कोरोनाच्या या महामारीच्या कालखंडात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या जुन्नर, आंबेगावकर बांधवांना एकत्र आणण्यासाठी या रहिवासी संघाची स्थापना करण्यात आली. एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ,विना सहकार नाही उद्धार या दोन उक्तीप्रमाणे एकमेकांच्या दैनंदिनसामाजिकव्यावसायिक अडचणींवर मात करण्यासाठी अनेक नवनविन उपक्रमांची आखणी रहिवाशी संघाच्या माध्यमातून करण्यात आली.

बांधवांच्या व्यवसायास चालनाअनेकांना नोकरीच्या संधी तसेच इतर अडीअडचणी वेळी मदत करत लोकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांसाठी एक व्यासपीठ मिळावे म्हणून या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यापुढेही असे अनेक नवनविन उपक्रम जुन्नर-आंबेगाव तालुका कल्याण-डोंबिवली रहिवासी संघामार्फत राबवले जातील असे रामचंद्र औटी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments