भिवंडी पोलिसांच्या वतीने महिलाचा गौरव

भिवंडी दि ९  ( प्रतिनिधी )  जागतिक महिला दिना निमित्त 
भिवंडी पोलीस संकुल येथे पोलीस आयुक्तालय अंतर्गत
भिवंडी परिमंडळ २, व भिवंडी मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार समारंभ काल सायंकाळी आयोजित करण्यात आला होता.


पोलीस उपाआयुक्त योगेश चव्हाण, न्यायमुर्ती अर्चना पानसरे,भिवंडी मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन डॉ.प्रवीण जैन डॉ.अभिषेक जैन,डॉ.सुप्रिया अरवारी,सहाय्यक पोलीस आयुक्त किशन गावीत, प्रशांत ढोले,अदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी डॉ.सुप्रिया अरवारी यांनी कॅन्सर जागरुकता बद्दल मार्गदर्शन ही केले.अनेक कष्टकरी महिला आपल्या संसार चालवताना आपल्या कुटुंबाला संघटित ठेवतात महिलांचे हे कार्य कौतुकास्पद आहे असे मत पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. उज्वला बर्दापूरकर,डॉ.शबनम इमरान खान,डॉ.जयश्री मस्के, अँड वृंदा संखे, योजना घरत यांच्यासह पोलीस महिला अधिकारी कर्मचारी, महिला दक्षता समिती सदस्य, वैद्यकीय,न्याय,शैक्षणिक, शिवणकाम, सफाई कामगार, तसेच आर्थिक, सामाजिक व दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या मान्यवर महिलाचा शाल, श्रीफळ, व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments