सुरेखा पांडे यांची भाजप उत्तर भारतीय मोर्चा डोंबिवली पूर्व महिला अध्यक्षापदी नियुक्ती

 डोंबिवली ( शंकर जाधव ) समाजिक कार्यात सदैव पुढे असणाऱ्या आणि भाजपसाठी कार्यरत असलेल्या सुरेखा पांडे यांची उत्तर भारतीय मोर्चा डोंबिवली पूर्व महिला अध्यक्षापदी नियुक्ती करण्यात आली.भाजप प्रदेश सरचिटणीस  तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप डोंबिवली पूर्व मंडल कार्यालयात कार्यक्रमात संपन्न झाला.  


         यावेळी उत्तर भारतीय मोर्चा डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष शिवम शुक्ला आणि डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्या हस्ते पांडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी डोंबिवली पूर्व सरचिट संजय कुलकर्णी, माजी नगरसेवक मुकुंद पेंडणेकर, डोंबिवली पूर्व मंडल महिला अध्यक्षा पूनम पाटील, कल्याण जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मिहीर देसाई  उपस्थित होते. यावेळी अल्पसंख्याक डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष जतीन गडा यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक आघाडीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

Post a Comment

0 Comments