कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ७५ हजारांचा टप्पा ८२९ नवीन रुग्ण तर ३ मृत्यू
कल्याण  ,  कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ७५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज ८२९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ५८६  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहेत.

 

      आजच्या या ८२९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ७५,४६२ झाली आहे. यामध्ये ७३४१ रुग्ण उपचार घेत असून ६६,९०९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १२१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८२९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-११४, कल्याण प – २६३, डोंबिवली पूर्व –२९०, डोंबिवली प – १०१, मांडा टिटवाळा – ४७,  मोहना – १०, तर पिसवली येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments