डम्पिंग ग्राऊंडच्या कचऱ्यात सापडल्या डिझेलने भरलेल्या बाटल्या

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : डम्पिंग ग्राऊंडच्या कचऱ्यात डिझेलने भरलेल्या बाटल्या सापडल्याने एकच खळबळ उडाली असून या बाटल्या कचऱ्याला आग लावण्यासाठी याठिकाणी टाकल्या आहेत का याचा शोध आता पालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा घेत आहे.


कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आधारवाडी येथील डम्पिंग ग्राऊंडच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला वारंवार आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी डम्पिंग ग्राऊंणच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागलेली आग तीनचार दिवस धुमसत होती. त्यामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागू नये म्हणून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाण्याचा फवारा मारण्याचे काम अग्नीशमन दलाच्या जवांना कडून केले जात असताना अग्नीशमन दलाच्या जवानांना कचऱ्याच्या डिगाऱ्यात पाच ते सहा डिझेल ने भरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या लपवून ठेवल्याचे निदर्शनास आल्याने अग्नीशमन दलाच्या जवानांनी सदरच्या डिझेलच्या बाटल्या संदर्भात माहिती घनकचरा विभागास दिली. 


या डिझेलने भरलेल्या बाटल्या चोरीच्या उद्देशाने ठेवल्या की आग लावण्यासाठी ठेवल्या या बद्दल तर्क वितर्काना उधाण आले असून या घटनेची घनकचरा विभागाने गंभीर दखल घेतली असून  या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात येणार असल्याचे सांगितले.


 कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला वारंवार लागत असून आग रौद्ररूप धारण करीत असून तीन चार दिवस आग आटोक्यात येत नसल्याच्या घटना वर्षभरात अनेक वेळा घडल्या आहेत. नुकत्याच पंधरा दिवसा पूर्वी १६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग लागली होती. या आगीमुळे आजुबाजूच्या परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले. ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीने प्रयत्न करूनही आग चार दिवस धुमसत होती. वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे कचऱ्यातून तयार होणारा मिथेन वायू मुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येते तर दुसरी कडे डम्पिंग ग्राऊंड परिसरात गर्दुल्ल्याचा मोठ्या प्रमाणावर वावर असून ते सिगारेट विडीपिटा असतात त्यामूळे सिगारेट विडीच्या पेटत्या चिटूरक्याने आग लागण्याची शक्यता वर्तविली जाते. 


 काही दिवसा पूर्वी डम्पिंग ग्राऊंड च्या कचऱ्याच्या लागलेल्या आगी मुळे पुन्हा आग लागू नये म्हणून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर  पाणी मारण्याचे काम अग्निशमन दल कडून केले जात असताना अग्निशमन दलाच्या जवानांना डिझेल ने भरलेल्या  पाच  ते सहा बाटल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात खोचून ठेवलेल्या दिसून आल्याने अग्नी शमन दलाच्या जवानांनी या बाबत त्वरित माहिती आपल्या वरिष्ठांना व पालिकेच्या घनकचरा विभागाच्या अधिकाऱयांना दिली. डिझेलने भरलेल्या बाटल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात कश्या काय आल्या डिझेल चोरी केलेल्या बाटल्या  होती की आग लावण्याच्या उद्देशाने डिझेल ने भरलेल्या बाटल्या ठेवल्या होत्या या बाबत तर्क वितर्काना उधाण आले असून या बाबत पालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविणार असल्याची माहिती दिली आहे.

Post a Comment

0 Comments