आदिवासी पाड्यांत होळी निमित्ताने भोजन व रेशन वाटप आर एस पी युनिटची अभिनव सामाजिक बांधिलकी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  आर.एस.पी. अधिकारी युनिटच्या वतीने आरएसपी कमांडर मनीलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक होळी सणानिमित्त कल्याण तालुक्यातील ठाकुरपाडा येथे  गरजू आणि गरीब आदिवासी बांधवाना भोजनवाटप  व  बांगरवाडी येथे तांदूळसाखरतेलबटाटेसाबणतुरदाळपीठ  व अन्नधान्य किटचे  वाटप करण्यात आले. "एक हात मदतीचा" या  संकल्पनेतून  हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


ठाकुरपाडा येथे आदिवासी ग्रामस्थांना बुंदीलाडू गुलाब -जांब  व भोजन वाटप करण्यात आले. तर बांगरवाडी येथे अन्नधान्य किट वाटप  वाटप करण्यात आले. यावेळी कल्याण तालुक्याच्या  पंचायत समिती सभापती अनिता वाकचौरेठाणे  जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री सासे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनेश ठक्कर  (स्वामीनारायण ट्रस्ट.), मधूबेन जयेश ठक्कर(नंदादीप फाउंडेशन,कल्याण)तरुण  नागडा (कच्छ युवक संघ) यांच्या  सहकार्यानेहा उपक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.  यावेळी महिला बचत गट मार्गदर्शिका नम्रता ठाकरेगोवेली गावच्या सरपंच पूजा जाधवसामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर ठाकरे आदी उपस्थित होते.


 या कार्यक्रमात आरएसपी युनिटच्या वतीने जयश्री सासेसभापती अनिता वाकचौरेकुंदे गावच्या सरपंच जागृती देवकरदहिवली गावच्या सरपंच निर्मला सावंत, उपसरपंच शारदा म्हारसे यांचा हिरकणी गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आरएसपी अधिकारी अनंत किनगेबंशीलाल महाजनजितेंद्र सोनवणेभगवान परदेशीछोटूलाल आहिरेकैलास पाटीलप्रभाशंकर शुक्लानितीन चंदेईया यांनी विशेष परिश्रम घेतलेतसेच नीरज यादव यांनी भोजन व्यवस्था करून दिली.

Post a Comment

0 Comments