चवदार तळे सत्याग्रह दिना निमित्त डोंबिवलीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
डोंबिवली ( शंकर जाधव ) २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्याग्रह केला होता.भारतातील हि अभूतपूर्व घटना इतिहासात जगभर नोंदली गेली आहे. या क्रांती दिनानिमित्त महाड येथे बाबासाहेबांचे अनुयायी दरवर्षी २० मार्च रोजी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेकरांनी अभिवादन करतात.पंरतु कोरोनाच्या महामारीमुळे सरकारने कार्यक्रम करण्यास बंदी घालती आहे.          त्यामुळे स्थानिक पातळीवरच कार्यक्रम घेण्यात आले.डोंबिवलीत रिपाई ( आठवले ) डोंबिवली शहर कार्यकारिणीने डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या समवेत कार्यालयात महाड क्रांतीदिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.यावेळी डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड,कार्याध्यक्ष माणिक उघडे,डोंबिवली शहर सरचिटणीस दिनेश साळवे, डोंबिवली शहर सहसचिव समाधान तायडे, डोंबिवली शहर उपाध्यक्ष सिद्धार्थ बलखंडे,डोंबिवली शहर संघटक संदीप पाईकराव,वाॅर्ड अध्यक्ष तेजस जोंधळे, राजेश भालेराव,मंगेश कांबळे,किशोर तांबे, चंद्रकांत वाढवे,प्रमोद साळवे,धम्मपाल सरकटे,विश्वास समशेर आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments