`ह`प्रभाग क्षेत्र हद्दीत दुकान दारांना कडून कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन पथक प्रमुख आणि कर्मचारी वर्गाची बारीक नजर
डोंबिवली  ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असल्याने पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी निर्बंध लागू केले आहेत.सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशी दुकान सुरु ठेवण्याची परवानगी आहे.सायंकाळी सात नंतर दुकाने सुरु दिसल्यास त्या दुकानांच्या मालकावर कारवाई केली जाते. 


या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पालिका अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग कारवाई करत आहेत. पालिका आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार डोंबिवली पश्चिमेकडील `ह`प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख विजय भोईर, दिलीप ( बुवा ) भंडारी यांच्यासह कर्मचारी वर्ग डोंबिवली पश्चिमेकडील सर्व दुकाने सायंकाळी ७ नंतर बंद करण्याचे काम करतात.दुकानदारांकडून पालिका प्रशासनाला चांगला प्रतिसाद मिळत असून वेळेप्रमाणे दुकाने बंद केली जातात.


याबाबत पथकप्रमुख विजय भोईर म्हणाले,`ह`प्रभाग क्षेत्रात दुकानदार आपली दुकाने वेळेवर बंद करतात.आम्ही दररोज सायंकाळी ७ वाजता दुकाने बंद केली आहेत कि नाही ते पाहणी करतो.तर स्टेशनपरिसरात फेरीवाले बसत नाही.तर सायंकाळी स्टेशन बाहेरील १०० मीटर बाहेर बसलेल्या फेरीवाल्यांनाहि सायंकाळी ७ नंतर बसल्यास मनाई आहे.दुकानदार प्रशासनाला सहकार्य करत असून यापुढे त्यांनी अश्याचप्रकारे सहकार्य करावे असेही भोईर यांनी सांगितले.तर कॉग्रेसचे माजी नगरसेवक नंदू म्हात्रे यांनी प्रशासन योग्य कारवाई करत असून दुकानदारांनी आणि नागरिकांनी प्रशासनला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments