राष्ट्रीय पोषण पंधरावडा निमित्त गरोदर माता, महिलांना आरोग्य विषयक माहिती

 


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : राष्ट्रीय पोषण पंधरावडा दिनांक १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत दरवर्षी राबविण्यात येतो. यावर्षी देखील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कल्याण ग्रामीण बिट आजदे १  मार्फत पिसवली आंगणवाडीत    साजरा करण्यात आला. यावेळी साई होम्योपैथिक मेडिकल कॉलेज नित्यानंद हॉस्पिटल एसोसिएट प्रोफेसर डॉ जे.पी. शुक्ला यांनी उपस्थित महिला व किशोरवयीन मुलींना आहारआरोग्यमासिक पाळीतील स्वच्छता व कोविडच्या अनुषंगाने गरोदर माता यांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.


 यावेळी पर्यवेक्षिका उषा लांडगेपिसवली येथील अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. तसेच त्यांच्या जीवनावर देखील प्रकाशझोत टाकत महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असे आवाहन डॉ. जे.पी. शुक्ला यांनी केले. 


तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमाची माहिती देखील महिलांना देत मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. तर यावेळी  उपस्थित सर्व महिलांचे थर्मल स्क्रीनिंग करूनच कार्यक्रमाल सुरवात करण्यात आली. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मास्क, स्वच्छता, सोशल डिस्टेंसिंग बाबत विशेष माहिती महिलांना देण्यात आली. तसेच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन देखील उपस्थित महिलांना करण्यात आले. 

Post a Comment

0 Comments