कल्याण डोंबिवलीत ४०४ नवीन रुग्ण तर ३ मृत्यू

 कल्याण , कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ४०४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत २४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहेत.      आजच्या या ४०४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६६,९२६ झाली आहे. यामध्ये ३०४० रुग्ण उपचार घेत असून ६२,७०३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ४०४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-५८,  कल्याण प – १२७डोंबिवली पूर्व १३३डोंबिवली प – ६४मांडा टिटवाळा – १७, तर मोहना येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments