भिवंडी पालिका क्षयरुग्ण विभागातर्फे महिलां करीता विशेष माहिती सत्र

 


भिवंडी :दि.११ (प्रतिनिधी ) भिवंडी निजामपूर शहर महानगपालिकेत वैद्यकीय आरोग्य विभागाचा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत जागतीक महिला दिवसाचे औचित्य साधून स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय येथे महिलां करीता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात ४० क्षयरोग रुग्ण महिला  उपस्थित होत्या.    


           पालिका क्षयरोग अधिकारी डॉ बुशरा सय्यद यांनी मार्गदर्शन करताना क्षय रोग झाला म्हणून रुग्णाने घाबरून जाऊ नये तसेच क्षयरोगाची लक्षणे व त्यावरील उपाय योजना याची माहिती दिली. वेळच्या वेळीच योग्य नियमित औषधे  व डॉट उपचार पद्धतीने क्षयरोग बरा होऊ शकतो याची खूणगाठ रुग्णांनी बाळगणे गरजेचे आहे असे सांगत आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक आहे,त्याकरीता नियमित व्यायाम तसेच पोष्टिक आहार घेणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन डॉ.बुशरा सय्यद यांनी या प्रसंगी केले.

Post a Comment

0 Comments