भिवंडीत भंगार गोदामांना भीषण आग; सात गोदामे जळून खाक

 
भिवंडी दि. २३ (प्रतिनिधी  )  भिवंडी शहरात अग्नितांडव सुरूच असून हे अग्नीसत्र थांबता थांबत नसतानाच शहरातील नागाव रोड चावींद्रा परिसरात असलेल्या भुसावल कंपाऊंड येथे असलेल्या भंगार गोदामांना भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. या आगीत एकूण सात भंगार गोदामे जळून खाक झाली आहेत. 


            या भंगार गोदामात कापड ,चिंध्या , पुट्ठे , तागे व इतर भंगार साहित्य ठेवण्यात आले होते. आगीचे नेमकी कारण अजून समजले नसून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान या भंगार गोदामांच्या आजूबाजूला रहिवासी घरे व यंत्रमाग कारखाने असल्याने आग लागल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून आगीच्या धुराने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. 

Post a Comment

0 Comments